माध्यमं, शेती आणि राजकारण (पूर्वार्ध)
माध्यमांची ही गल्लत का होते? मुख्य प्रवाही माध्यमांचा तोंडवळा पूर्णतः शहरी आहे. शहरी मध्यमवर्ग, ग्राहक हाच आपला क्लाएंट आहे, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे शेतीचे प्रश्न आपल्या वाचकांसाठी, प्रेक्षकांसाठी महत्त्वाचे नाहीत, असं त्यांनी ठरवून टाकलंय. मुळात हे गृहीतकच चुकीचं आहे. मुंबई आणि पुण्याचा काही भाग सोडला, तर संपूर्ण शहरी क्लाएंट अपवादानेच दिसतो. मग या ठिकाणी तरी शेतीचे प्रश्न महत्त्वाचे मानले पाहिजेत ना?.......